शिक्षण ही काळाची गरज आहे,प्लीज तुमच्या मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करा, मी मागील ६ महिन्यांपासून केरळ ला राहतोय , पॉलिटिक्स संबधित गोष्टी सोडल्या तर केरळ मधील सर्वात उत्तम गोष्ट अशी की इथल्या महिला खुप जास्त शिक्षित आहेत , शिक्षण म्हणजे फ़क्त डिग्री घेऊन अर्थ नाही , क्वालिटी एजुकेशन खुप आवश्यक आहे , आपल्या इथे महाराष्ट्रामधे मी एक गोष्ट पाहिली , गावाकडील मुलाना इंजीनियरिंग करुण सुद्धा जॉब मिळत नाही , कारण त्यांच्याकडे डिग्री आहे पण नॉलेज नाही , शहरातील मुलांची परिस्थिति पण सारखिच , इंजीनियरिंग करुण सुद्धा सपोर्ट मधे आणि कॉल सेण्टर ला काम करणारे कमी नाहीत , जर आवड असेल तर customer care job वाईट नाहीत पण मग इंजीनियरिंग करुण काय उपयोग ...
आपल्या प्रॉब्लेम ला सोल्युशन एकच , क्वालिटी एजुकेशन खुप जास्त आवश्यक आहे , ज्यांना कुठेपन जॉब मिळत नाही , आणि ज्यांना नॉलेज नाही अशी मंडळी सुद्धा शिक्षक म्हणून काम करत आहेत , आणि ही अशी लोक काय क्वालिटी एजुकेशन देणार आणि यांच्या विद्यार्थ्यांना कोणती कंपनी इंजीनियर चा जॉब देणार ..
अशी खुप विद्यार्थी आहेत ज्यांच्याकड़े डिग्री आहे पण , त्यांना कोणी कॉल सेण्टर ला पण जॉब देत नाही , ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे , विशेष करुण शिक्षकांनी सुद्धा , जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर प्लीज शिका , पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भवितव्य ख़राब करू नका ... शिक्षक सुद्धा ऑनलाइन शिकु शकतात , खुप ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम आहेत , शिक्षकांनी ते जरी refer केले तर हरकत नाही , महाराष्ट्राचे भविष्य आपल्याच हातात आहे ...
केरळ मधे हाई क्वालिटी एजुकेशन आहे त्यामुळे इथल्या महिलापन पुरुषांपेक्षा कमी नाहीत .. आपण सर्वांनी शिक्षणाला महत्व दिले तरच प्रगति होईल , नाहीतर काही खर नाही आणि हो तुमच्याकडे शेती असेल , बिज़नेस असेल तरीपण मुलांना शिकवा , कारण चांगल शिक्षण कधीच वाया जात नाही ..
शिक्षण हे माणसाला ज्ञान देणारी अनमोल असलेली भूमिका आहे. ज्ञान हा अद्वितीय धन आहे ज्याने व्यक्तीला जीवनात उच्च स्थाने मिळवू शकतात. शिक्षण या ज्ञानाच्या संग्रहालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
शिक्षणाचा हा अद्वितीय विचार नको असताना, संसारातील कोणत्याही प्रकारच्या संस्था, समाज, किंवा देशाची प्रगती संभव नसते. शिक्षण म्हणजे समृद्धीचा, समाजाच्या विकासाच्या, व्यक्तिच्या विकासाच्या, आणि एक सुखी आणि संतुष्ट जीवनाच्या वाटेचा एक मार्ग.
शिक्षण हा त्यांच्या पाठीशी सुरु असतो ज्या संस्थानांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ज्ञान व शिक्षण देतात. शिक्षण संसाराच्या हरकतीचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.
शिक्षणाची गरज वाढत असताना समाजात विविध प्रकारच्या शिक्षण संस्थांची स्थापना केली जाते. त्यांनी विविध विद्यांना शिकवून त्यांच्या विकासास सहाय्य करतात.
शिक्षण हे केवळ पाठ्यक्रमांची संपूर्णता नसते. त्याच्या साठी विचारशीलता, तंत्रज्ञान, कला, सामाजिक सामग्री, आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या सामर्थ्याची गरज असते.
शिक्षणाचा प्रमाण हे ज्ञानाचा अभ्यास आणि प्रदर्शन आहे. शिक्षण मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करण्याचा एक अद्वितीय प्रणाली आहे.
अशाच प्रकारे, शिक्षणाची गरज समाजाच्या सर्वांत मोठ्या गरजेची असते. त्यामुळे, शिक्षण हा काळाचा महत्त्वाचा आणि अनिवार्य भाग आहे. याचा पालन करण्यामुळे ज्ञानाची वाढ व ताकद होते आणि समाजाचा विकास होतो.
(स्वप्निल व्यवहारे)